नमस्कार आपल्याला जर महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघाचे सभासद व्हायचे असेल तर पुढील प्रमाणे आपण स्टेप्स फॉलो करा.
सर्वप्रथम सभासद नोंदणी या विंडो मध्ये जाऊन आपला मोबाईल नंबर टाकावा.
आपल्या मोबाईलवर आलेला OTP टाकून आपला मोबाईल नंबर व्हेरिफाय करून घ्यावा.
या नंतर समोर असलेली माहिती म्हणजे आपले नाव जन्मदिनांक ई-मेल आयडी व काम करत असलेला जिल्हा ही माहिती भरून SUMIT हे बटन दाबावे.
या नंतर आपल्या रजिस्टर मोबाईल नंबर वर आपला सभासद क्रमांक म्हणजेच आपला युजर आयडी व पासवर्ड आपल्याला SMS द्वारे पाठवण्यात येईल.
यानंतर LOGIN या विंडो वर जाऊन SMS द्वारे आलेला युजर आयडी व पासवर्ड टाकून आपण LOGIN करावे.
व यानंतर सभासद फी भरा हे बटन दाबून ऑनलाइन पद्धतीने आपली सभासद फी भरावी आपण जर सभासद फी भरली नाही तर आपले सभासदत्व ग्राह्य धरले जाणार नाही याची नोंद घ्यावी.
यानंतर जर आपण कोर्ट केस मध्ये असाल तर शोधा या विंडो मध्ये आपले नाव टाकून आपण आपले नाव शोधून आपल्या प्रोफाइल सोबत आपला कोर्ट केस नंबर हा जोडून घ्यायचा आहे.
या प्रकारे आपण आपले सभासद रजिस्ट्रेशन हे ऑनलाइन पद्धतीने करू शकतात धन्यवाद